
शिवसेना स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ शिवसैनिक जयवंत मकाजी (67) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.
आस्थापनेत होणाऱ्या नोकरभरतीत भुमिपुत्रांवर अन्याय होत असल्याने जयवंत मकाजी यांनी केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या अतिसंवेदनशील भाभा अणुशक्ती केंद्रात लोकाधिकार महासंघाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिय लोकाधिकार समितीची स्थापना करून मराठी उमेदवारांना न्याय मिळवून दिला. भाभा अणुशक्ती केंद्र स्थानिय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस म्हणून त्यांनी कामगारांचे नेतृत्त्व केले व त्यांचे असंख्य प्रश्न सोडवले. निवृत्तीनंतरही ते लोकाधिकार समितीत सक्रिय होते. त्यांची शोकसभा शुक्रवारी 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजता चेंदणी कोळीवाडा ठाणे येथील श्री आनंद भारती सभागृहात होणार आहे.





























































