नगरमध्ये अवैध वाळू उपसा करणारा जेसीबी, दोन डंपर, ट्रॅक्टर जप्त

592

नदीपात्रात वाळू उपसा करणारा जेसीबी, दोन डंपर तसेच एक ट्रॅक्टर सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी छापा टाकून शनिवारी पहाटे पाच वाजता जप्त केले. स्थानिक तसेच नगरच्या कर्मचाऱ्यांना चकवा देत गवळी यांनी केलेल्या या कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चर जणांना अटक करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अवैध वाळू व्यवसायांनी हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. राजेश गवळी यांनी शनिवारी पहाटे नागापूरवाडी गाठून तेथे वाळू उपसा करणारा जेसीबी, वाळू चाळणारा ट्रॅक्टर तसेच वाहतूक करणारे दोन डंपर ताब्यात घेतले. या प्रकरणी संजय शिवाजी पथवे (वय 28), बाळासाहेब तानाजी मेंगाळ (वय 24), भारत बुवाजी पथवे (वय 23, तिघेही नागापूरवाडी ता. पारनेर), राहुल पांडूरंग जाधव (रा. आनंदनगर, पारनेर) यांना अटक करण्यात आली. गवळी यांच्या नेतृत्वाखालील पथकामध्ये सहाय्यक फौजदार जी. एन. फसले, गहिनीनाथ यादव, अनिल रोकडे यांचा समावेश होता. अनिल रोकडे यांच्या तक्रारीवरून चारही आरोपींना अटक करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या