राहातामधून पाच लाखांच्या क्रूझर जीपची चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राहाता

राहाता येथील आंबेडकर नगर या दाट लोकवस्तीच्या परीसरातून पाच लाख रूपये किंमतीची क्रुझर जीप चोरीला गेली असून राहाता पोलीसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ही चोरी 1 मार्चला रात्री घडली आहे. गाडीचा चालक शरद वाघमारे याने दिवसभर गाडी चालवली. आंबेडकर नगर येथील समाज मंदिरासमोर रात्री गाडी उभई करून तो झोपायला घरी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी त्या ठिकाणी नव्हती. गाडीचे मालक शिवाजी तांबे यांना फोनकरून त्याने घटनेची माहिती दिली. तसेच गाडीचा इतरत्र शोध घेतला. मात्र गाडी मिळाली नाही. शरद वाघमारे याच्या फिर्यादीवरून राहाता पोलीसांनी गाडी चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहा महिन्यापुर्वीही राहाता शहरातून चितळी रोडवरून एक क्रुझर गाडी चोरीला गेली होती. ती काही दिवसांनी औरंगाबाद पोलिसांना सापडली होती. यापुर्वी मोटारसायकल चोरीच्या घटना नेहमीच घडत असून त्यात आता चारचाकी गाड्या चोरीच्या घटना घडू लागल्याने नागरीकांमधे चिंतेचे वातावरण आहे.