जेट एअरवेज आकाशात झेप घेण्यासाठी पुन्हा सज्ज?

आर्थिक मंदीमुळे गेल्या वर्षी बंद करण्यात आलेली ‘जेट एअरवेज’ पुन्हा एकदा आकाशात झेप घेण्यासाठी सज्ज होत आहे. जेट एअरवेजला कर्ज देणाऱ्या कमेटी ऑफ क्रेडिटर्सने जेट एअरवेजच्या ठराव योजनेस मान्यता दिली आहे.

आर्थिक डबघाईस आलेल्या जेट एअरवेज या कंपनीची ठराव योजना ब्रिटनची कंपनी कॉर्लोक कॅपिटल आणि उद्योगपती मुरारीलाल जालान यांनी सादर केली आहे. जेट एअरवेज रिझोल्युशन प्रोफेशनलने बीएसईला दिलेल्या माहितीत सांगितले की, या प्रस्तावावर सर्व प्रथम ई-वोटिंग झाली. त्यानंतर या ठरावास मंजुरी देण्यात आली. ई-वोटिंगच्या माध्यमातून मुरारीलाल जालान आणि फ्लोरिएन फ्रिटश यांच्या ठराव योजनेला 17 ऑक्टोबरला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे जेट एअरवेजची सेवा परत सुरू होण्याची शक्यता आहे.

कर्मचाऱ्यांना दिलासा
देशात आधीच बेरोजगारीचे सावट असताना गेल्या वर्षी जेट एअरवेज कंपनी बंद पडली. त्यामुळे 20 हजार कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. कंपनीवर जवळपास 6 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. कंपनी बंद झाल्यामुळे 16 हजार पे-रोल कर्मचारी आणि 6 हजार कॉण्ट्रक्ट कर्मचारी बेरोजगार झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या