डोंबिवलीत ‘ठग्ज ऑफ ज्वेलर्स’; 15 कोटींचा गंडा घालून सराफ फरार

28

सामना प्रतिनिधी, डोंबिवली

‘10 तोळे सोने गुंतवा.. एका वर्षात 12 तोळे सोने घरी घेऊन जा’ अशी बतावणी करून डोंबिवलीच्या प्रथमेश ज्वेलर्सने गुंतवणूकदारांना तब्बल 15 कोटींना ठगवले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वर्षभरापूर्वी गुंतवणूक केल्यानंतर दिवाळीत सोने परत घेण्यासाठी गुंतवणूकदार ज्वेलर्सच्या दुकानात गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. लायसन्स नसताना बँकेप्रमाणे ठेवी घेऊन नागरिकांना फसवणारा आरोपी ठगसेन ज्वेलर्स अजित कोठारी हा फरार असून त्याच्याकर फसवणुकीचा आणि अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

अजित कोठारी याच्याकर 85 लाखांची फसवणूक केल्याचा पहिला गुन्हा रामनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. त्यानंतर नऊ जणांनी कोठारीविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंग पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतील मानपाडा रोडवर गेल्या 15 वर्षांपासून असलेल्या प्रथमेश ज्वेलर्सने सोन्याचे दागिने ठेवी स्वरूपात घेणे सुरू केले. ‘10 तोळे सोन्याचे दागिने आमच्याकडे ठेवा, एक वर्षानंतर 12 तोळे सोन्याचे दागिने परत करू’ असे अजित याने सांगितल्यावर अनेक गुंतवणूकदार या आमिषाला बळी पडले व त्यांनी पै पै करून जोडलेले सोन्याचे दागिने ज्वेलर्समध्ये ठेवले, पण दिवाळी जवळ आल्याने दागिने परत घेण्यासाठी ते गेले असता ज्वेलर्सचे मालक अजित कोठारी आपले दागिने घेऊन पसार झाल्याचे त्यांना समजले. गेल्या तीन महिन्यांपासून आपले दुकान बंद करून पळून जाण्याच्या तयारीत आरोपी अजित कोठारी होता असे पवार यांनी सांगितले.

गुंतवणूकदारांना आवाहन
जनतेचे पैसे परत मिळावे म्हणून पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अशा प्रकारची अजून कोणाची फसकणूक झाली असल्यास तक्रार देण्यासाठी तत्काळ डोंबिवली रामनगर पोलीस ठाणे 0251-2860101 यावर संपर्क करावा, असे आवाहन करणारे फलक प्रथमेश ज्वेलर्स दुकानाकर पोलिसांनी लावले आहेत.

रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक
अजित कोठारीने बदलापूर, वांगणी आणि डोंबिवली येथील रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे दुबईलाही त्याने गुंतवणूक केली असून त्याचा शोध सुरू आहे.

summary- jeweler thug its clients for 15 crore

आपली प्रतिक्रिया द्या