निवडणूक आयोगाने झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तारखाही जाहीर केल्या. झारखंडमध्ये 13 व 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यात विधानसभेच्या 81 जागा आहेत. येथे 2.6 कोटी मतदार आहेत. 29 हजार 562 मतदान पेंद्रांवर मतदान होईल. यात 24 हजार 520 बूथ ग्रामीण भागात असतील, दरम्यान, याआधी झारखंडमध्ये पाच टप्प्यांत निवडणुका झाल्या होत्या. नक्षल परिसर आहे. त्यामुळे यावेळी दोन टप्प्यांत निवडणूक होत आहे.
झारखंडमध्ये 2.6 कोटी मतदार आहेत. यात 1.29 कोटी महिला मतदार तर 1.31 कोटी पुरुष मतदार आहेत. 11.84 लाख मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. 66.84 टक्के तरुण मतदार आहेत. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी 29,562 मतदान पेंद्रे असणार आहेत. 5 हजार 42 शहरी भागात तर 24 हजार 520 मतदान केंद्रे ग्रामीण भागात असतील. यातील 1 हजार 271 मतदान केंद्रांमध्ये महिला अधिकारी, कर्मचारी असणार आहेत, असे निवडणूक आयुक्त म्हणाले.
महाराष्ट्रात विधानसभेच्या महायुद्धाचे ऐलान, एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान
निवडणूक प्रक्रिया
मतदान- 13 ते 20 नोव्हेंबर
सर्वसाधारण जागा 44
एससी- 9
एसटी- 28
निकाल- 23 नोव्हेंबर
बहुमताचा आकडा- 41
पहिला टप्पा 13 तर दुसरा टप्पा 20 नोव्हेंबरला
पहिल्या टप्प्यासाठी 28 ऑक्टोबर तर दुसऱया टप्प्यासाठी 30 ऑक्टोबर रोजी उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल.
– 30 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी होईल तर पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना 30 ऑक्टोबरपर्यंत आणि दुसऱया टप्प्यातील उमेदवारांना 1 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार