झारखंडचे मुख्यमंत्री होम क्वारंटाईन, मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचाऱयांना सुट्टी

326

हिंदुस्थानात कोरोनाचा आकडा 7 लाख 45 हजार 390 वर पोहचला तर 20 हजार 683 रुग्ण दगावले. महाराष्ट्रात सर्वाधिक 9 हजार 250 रुग्ण दगावले असून, 2 लाख 17 हजार 121 कोरोनाबाधित आढळले आहेत. झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन होम क्वारंटटाईन झाले असून, मुख्यमंत्री कार्यालयाला सात दिवसांची सुट्टी देण्यात आली. मंत्री मिथीलेश ठाकूर व आमदार मथुराप्रसाद मेहता यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या संपर्कात आलेले मुख्यमंत्री सोरेन व इतर कार्यालयातील कर्मचारी यांची चाचणी केली जाणार आहे.

देशात कोरोनाची रुग्णसंख्या दररोज मोठय़ा प्रमाणात वाढत असतांना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 62 टक्क्यांवर पोहचले. यामुळे कोरोनाच्या रुग्णांना दिलासा मिळाला असून, मृत्यूदरही जगाच्या तुलनेत हिंदुस्थानात कमी आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या