
झारखंड विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याचे संकेत सर्वच एक्झिट पोल्सच्या अंदाजातून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, एकाही पोलमध्ये भाजपला निवडणुकीत बहुमत मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात आलेली नाही. झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो), राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांची आघाडी बाजी मारणार असे भविष्य वर्तविण्यात आले आहे.

























































