झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री चंपई सोरेन आता नवीन पक्ष काढणार आहेत. दिल्लीहून सरायकेला परतल्यानंतर 12 तासांनी आज त्यांनी आपल्या निवासस्थानी याबाबतची घोषणा केली. आम्ही राजकारणातून संन्यास घेणार नाही. आम्ही जो अध्याय सुरू केलेला आहे, त्याचे चॅप्टर बदलत राहणार असे चंपई सोरेन म्हणाले.
निवडणुच्या पार्श्वभूमीवर नवीन पक्ष काढण्यासाठी कमी वेळ शिल्लक आहे, असे विचारले असता तुम्हाला यात काय अडचण आहे? तीन ते चार दिवसांत 30 ते 40 हजार कार्यकर्ते आले, मग आम्हाला नवीन पक्ष काढायला काय हरकत आहे? सात दिवसांत सर्व काही स्पष्ट होईल असेही ते म्हणाले. झारखंड सरकारमध्ये कायम राहणार का, असा सवाल पत्रकारांनी विचारला असता जेव्हा आपण नवीन अध्याय सुरू करू तेव्हा एका किंवा दोन ठिकाणी राहू का? जनतेच्या पाठिंब्याने आमचे मनोबल उंचावले आहे, असे चंपई म्हणाले.