155 रुपयांत दिवसाला 1 GB डेटा, वाचा काय आहे जियोचा स्वस्त प्लॅन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिलायन्स जियोने ग्राहकांसाठी स्वस्तात काही ऑफर आणल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे 155 रुपयांचा रिचार्ज. या रिचार्जमध्ये ग्राहकाला स्वस्तात डेटा, अनलिमिटेड कॉल आणि मेसेजिंग सुविधा मिळणार आहे.

155 रुपयांच्या रिचार्जची वैधता 28 दिवसांची आहे. 149 रुपयांच्या रिचार्जच्या तुलनेत ग्राहकाला या या रिचार्जमध्ये चार दिवसा जास्त मिळतात. 155 रुपयांच्या रिचार्जमध्ये दिवसाला ग्राहकाला 1 GB डेटा मिळतो. म्हणजे ग्राहकाला महिन्याला एकूण 28 GB डेट मिळतो. ग्राहकाचा एक GB डेटा संपल्यास त्याची स्पीड कमी होऊन 64 kbpsवर येतो.

जियोने नुकतंच IUC शुल्क हटवले आहे. त्यामुळे कुठल्याही नेटवर्कवर ग्राहकांना मोफत कॉलिंग सुविधा मिळणार आहे. दिवसाला 100 मेसेजही ग्राहकांना मिळतात. इतकेच नाही तर जियो टीव्ही आणि जियो सिनेमाचे मोफत सब्सस्क्रिप्शनही ग्राहकांना या रिचार्जमधून मिळेल.