जिओचा ग्राहकांना पुन्हा झटका! रिचार्ज पुन्हा महाग

जिओने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. रिलायन्स जिओने नेटफ्लिक्स प्लानच्या किमतीत 200 ते 300 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. 84 दिवस वैधता असलेल्या प्लानची किंमत 1099 रुपये होती. परंतु आता ग्राहकांना 1299 रुपये मोजावे लागणार आहेत. या प्लानमध्ये ग्राहकांना नेटफ्लिक्स सुविधेसह रोज 2 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, 100 एसएमएस मिळतात. तर दुसरा प्लान 1499 रुपयांचा आहे. परंतु ग्राहकांना आता या प्लानसाङ्गी 1799 रुपये मोजावे लागतील. या प्लानची वैधतासुद्धा 84 दिवसांची आहे. यात ग्राहकांना नेटफ्लिक्स सुविधेसोबत दररोज 3 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, 100 एसएमएस मिळतात. जिओने याआधी टॅरीफ प्लानच्या किमतीत वाढ केली होती. जुलै महिन्यात 12 ते 27 टक्क्यांपर्यंत रिचार्ज प्लानच्या किमती वाढवल्या होत्या.