जियो गिगा फायबर ग्राहकांना मिळणार मोफत एलईडी टीव्ही आणि सेट टॉप बॉक्स

2909

सामना ऑनलाई । मुंबई

बहुप्रतिक्षित जियो फायबगर सेवा पाच सप्टेंबरपासून ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. तसेच जियो सेट टॉप बॉक्स लाँच करणार असून जियो एअवर प्लानच्या माध्यमातून ग्राहकांना मोफत एलईडी टीव्ही मिळणार आहेत अशी रिलायन्स उद्योगसमुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी दिली. आज मुंबईत रिलायन्स उद्योगसमुहाची 42 वी वार्षिक सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अंबानी बोलत होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू कश्मीर वर जो निर्णय घेतला आहे. त्याचा आपण आदर करतो असे मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे. म्हणून जम्मू आणि लडाखमधील नागरिकांना विशेष सेवा देऊ असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

जियो कंपनीने हिंदुस्थानमध्ये 34 कोटी ग्राहक झाले आहेत अशी माहिती मुकेश अंबानी यांनी दिली. तसेच अंबानी यांनी जियो गिगा फायबर लॉच करण्याची घोषणा केली. जियो गिगा फायबरची किंमत 700 रुपयांपासून 10 हजार पर्यंत असेल. तसेच या इंटरनेट सेवेतून ग्राहकांना 1 GBPS पर्यंत स्पीड मिळणा आहे. तसेच जियो ग्राहकांना लॅंडलाईन फोन, अल्ट्रा हाय डेफिनेशन एंटरटेनमेंट, वर्च्युअल रिऍलिटी सारख्या अनेक सेवा मिळणार आहेत.

या सभेत जियो सेटाटॉपचीही घोषणा करण्यात आली. जियो फॉर एवर प्लान मधून ग्राहकांना मोफत एलईडी आणि 4 के सेटटॉप बॉक्स मिळणार आहे. 5 सप्टेंबरपासून ही सेवा ग्राहाकंना मिळणार असल्याचे अंबानी यांनी यावेळी जाहीर केले.

आपली प्रतिक्रिया द्या