जेएनयूच्या विद्यार्थ्यांचा संसदेवर मोर्चा, संसद भवन परिसरात जमावबंदी लागू

490

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) वसतिगृह फी वाढीच्या निषेधार्थ गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचा विरोध वाढत आहे. वसतीगृहाची फी, कँटिनचे वाढीव दर तसेच इतर अनेक मुद्द्यांना विरोध करत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता आपला मोर्चा संसदेकडे वळवला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जेएनयूमधील विद्यार्थ्यांनी संसदेवरच मोर्चा नेला आहे.

विद्यापीठाचे शेकडो विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. सकाळी साडे अकराच्या सुमाराला आपल्या मागण्यांचे फलक हातात घेतलेल्या अवस्थेत, गाणी म्हणत आणि घोषणा देत विद्यार्थ्यांनी संसदेच्या रस्त्याने वाटचाल सुरू केली. हिवाळी अधिवेशनामध्ये ही फीवाढ मागे घेण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या या मोर्चाला बेर सराय इथेच अडवलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा मोर्चामुळे संसद सुरक्षेला धोका उत्पन्न होऊ शकत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना संसद भवन परिसरात जाण्याआधीच रोखण्यात आलं आहे. तसंच संसद भवन परिसरात कलम 144 लागू करण्यात आलं असून जमावबंदी करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या