कॉलसेंटर क्षेत्रातील नोकरीच्या संधी वाढल्या

जॉब साइट इंडिडच्या माहितीनुसार, गेल्या 4 वर्षांमध्ये कॉल सेंटर आणि रिमोट ग्राहक सेवा क्षेत्रात नोकऱया शोधणारांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. कॉल सेंटर आणि रिमोट ग्राहक सेवा क्षेत्रांशी संलग्न नोकरींचे जॉब पोस्टिंग करण्यात मुंबईचा देशात तिसरा क्रमांक लागतो.जानेवारी 2020 ते जानेवारी 2021 या काळात कॉल सेंटर आणि रिमोट ग्राहक सेवा या नोकऱयांमध्ये मोठी वाढ झाली होती असे इंडिडच्या डेटा दर्शवितो.