शुभवार्ता! बँकांत नोकरीची दारं खुली!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बँकेत नोकरी करणाऱ्या बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँक (एसबीआय),  आयडीबीआय बँक आणि  सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सध्या भरती सुरू आहे. एसबीआयमध्ये 116 जागा, आयडीबीआयमध्ये 1300 जागा तर  सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 275 जागा भरल्या जाणार आहेत

आयडीबीआय… 1300

आयडीबीआय बँकेत एकूण 1300 जागांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. असिस्टंट मॅनेजर-ग्रेड ए पदांच्या 200 जागा आणि ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदाच्या 1300 जागा ऑनलाइन पद्धतीने भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 19 मार्च असून परीक्षा नंतर कळवली जाणार आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती https://www.idbi.bank.in वेबसाईटवर आहे. दोन्ही पदांसाठी उमेदवार हा कमीत कमी 60 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सामान्य वर्गासाठी 1050 रुपये तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250 रुपये फी भरावी लागणार आहे.

सेंट्रल बँक… 275  

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 275 जागांची भरती केली जात असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2026 पर्यंत आहे. या भरतीची परीक्षा एप्रिलमध्ये होणार आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज करण्याची पद्धत यांसह माहिती https://ibpsreg.ibps.in या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत स्पेशालिस्ट ऑफिसर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, मोबाईल डेव्हलपर, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेशन, डिजिटल चॅनेल मॅनेजर,  क्लाऊड मॅनेजर, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, नेटवर्क एडमिनिस्ट्रेटर, प्रोडक्शन सपोर्ट, आयटी ऑफिसर, सीए, रिस्क मॅनेजर आदी पदे भरणार आहेत.

एसबीआय… 116

भारतीय स्टेट बँकेत 116 जागांसाठी भरती केली जात आहे. या भरतीमध्ये असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट (आयएस ऑडिट) पदांच्या 12, डेप्युटी मॅनेजर (आयएस ऑडिट) पदांच्या 43, डेप्युटी मॅनेजर (चार्टर्ड अकाऊंटंट, इंटरनल ऑडिट) पदांच्या 61 जागा अशा एकूण 116 जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 15 मार्च 2026 पर्यंत आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, अर्जासोबत भरायला लागणी फी यांसह भरतीसंबंधी सविस्तर माहिती https://recruitment.sbi.bank.in या वेबसाईटवर देण्यात आली आहे.