महाराष्ट्रद्रोही मिंधे-भाजप सरकारचा भ्रष्टाचार आणि अक्षम्य बेजबाबदारपणामुळे राजकोटमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप आहे. महाराष्ट्रद्रोह्यांना माफ करणार नाही, असा निर्धार करीत शिवरायांचा अवमान करणाऱ्या शिवद्रोही सरकारला शिवसेनेसह महाविकास आघाडीकडून आज पश्चिम महाराष्ट्रात ठिकठिकाणी ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पूजन करण्यात आले.
भरपावसात सोलापुरात आंदोलन !
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेला राज्यातील महायुतीचे भ्रष्ट आणि शिवद्रोही सरकारच जबाबदार आहे. या शिवद्रोही महायुती सरकारचा कडेलोट केल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असा इशारा सोलापूर शहर जिल्हा युवा सेनेच्या वतीने देण्यात आला. भरपावसात चार हुतात्मा पुतळा येथे महायुती सरकारला जोडे मारत निषेध नोंदविण्यात आला.
युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी बालाजी चौगुले यांच्या नेतृत्वाखाली तसेच शहरप्रमुख विठ्ठल वानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. यावेळी लहू गायकवाड, तुषार आवताडे, अनिरुद्ध दहीवडे, सचिन हेगडे, विजय मोटे, दत्त खलाटे, अविनाश भोळे, विशाल चोरगे, अक्षय बिराजदार, प्रणित जाधव, राहुल कांबळे, प्रथमेश तपासे, सुभाष सातपुते, वैभव लोंढे, नितीन भोसले, गुरुनाथ शिंदे, विष्णू जगताप, गुरू बेंद्रे उपस्थित होते.
राहुरीत शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक
राहुरी/देवळाली प्रवराः राहुरी तालुका शिवसेनेच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून पूजन करण्यात आले. सचिन म्हसे यांच्या नेतृत्वाखाली व उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या उपस्थितीत महायुती सरकारचा निषेध करण्यात आला. छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्यास कारणीभूत ठरलेल्यांचा निषेध करण्यात आला. युवासेनेचे गणेश खेवरे, भरत धोत्रे, महिपती शिरसाठ, बाळासाहेब गाडे, सुनील शेलार, राहुल चोथे, सुधीर झांबरे, अनिल खपके, रमेश खुळे, सुधीर झांबरे, बाळासाहेब शिंदे, काकासाहेब शिंदे, सोमनाथ हारदे, रोहित शिंदे, शहाजी वराळे, विठ्ठल सूर्यवंशी, कैलास लाटे, सचिन शीरसागर, सुभाष जगताप, विठ्ठल कोळसे, प्रदीप होन, गणेश जाधव, पोपट शिरसाठ, मनीष देठे, सागर मुसमाडे, सनी भोंगळ, विठ्ठल राऊत, अमोल कुराडे, अजय हिवाळे, विलास कपके, दिगंबर कोहकडे, गोविंद कदम, अरविंद सोनवणे आदी उपस्थित होते.
बेलापुरात शिवसैनिकांकडून शिवरायांना दुग्धाभिषेक
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज बेलापूर येथे महायुती सरकारला ‘जोडे मारो’ आंदोलन करत निषेध नोंदवला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ाला दुग्धाभिषेकही करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष लखन भगत, माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, रोहित वाकचौरे, अशोक थोरेमामा, भगवान उपाध्ये, सुधीर वायखिंडे, राजेंद्र बोरसे, संजय साळवे, सिद्धांत छल्लारे, सुरेश थोरे, तेजस बोरावके, दत्तात्रय करडे, बापू बुधेकर, रोहित नाईक, मुस्ताक शेख, किशोर मकाने, उत्तम कल्याणकर, अकील पठाण, विशाल दुपटी, विशाल पापडीवाल, राजू डुकरे, विजूभाऊ बडाख, प्रसाद पुजारी, अमर हिवाळे, कृष्णा साठे, विशाल रनवरे, गौरव अवसर, सनी रणदिवे, सागर शिरसाठ, सचिन आहेर, अनिकेत ब्राह्मणे, मोहित साळवे, गोविंद रणवरे, आकाश रणवरे, प्रकाश रणवरे, भय्या लोंढे, अमोल शेळके, विकास ठोंबरे, कैलास आवटी, मुस्ताक शेख, उमेश भांड, सतीश कारले, सुरेश जाधव, चंद्रकांत नाईक, रफिक शेख उपस्थित होते.