बसच्या धडकेत मोटारसायकल स्वाराचा मृत्यू

बसच्या धडकेत मोटारसायकल स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रवी सुदाम बोडवे असे त्या मोटारसायकल स्वाराचे नाव आहे. त्याच्या मृत्यू प्रकरणी पवई पोलिसांनी बसचालक मोह्हमद इब्राहिम अब्दुल शेखला अटक केली. रवी बोडवे शनिवारी मोटारसायकलने जोगेश्वरी -विक्रोळी लिंक रोड येथून जात असताना बसने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. या घटनेची माहिती समजताच पवई पोलीस घटनास्थळी धाव घेऊन जखमी अवस्थेतील रवी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी रवीला मृत घोषित केले.

 

आपली प्रतिक्रिया द्या