‘रॉ’चा विकेंड जोरात, 20 कोटींची कमाई

सामना प्रतिनिधी । मुंबई

जॉब अब्राहमच्या ‘रॉ’ चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत 12 कोटींची कमाई केली आहे. शुक्रवार, 5 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या ‘रॉ’ ने पहिल्या दिवशी 6 कोटी तर शनिवारी 7 कोटींची कमाई केली. विकेंडला एकूण कमाई 20 कोटींच्या आसपास जाईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. अक्षयकुमारचा केसरी आणि विद्युत जांबवालचा जंगली यांचे कलेक्शन आता थंड पडले आहे. रॉ म्हणजे रोमियो, अकबर, वॉल्टर हा चित्रपट म्हणजे 1970 ची पार्श्वभूमी असलेला थरारपट आहे. जॉन अब्राहमसह मौनी रॉय, जॅकी श्रॉफ आणि सिकंदर खेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या