स्वत:पेक्षा तीस वर्षांनी लहान तरुणीसोबत लग्न करणार हा अभिनेता

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

हॉलिवूडचा सुपरस्टार जॉनी डेप हा सध्या त्याच्या अफेयरमुळे चांगलाच चर्चेत आहे. सध्या जॉन त्याच्या पेक्षा 30 वर्षांनी लहान तरुणीला डेट करत असून ते येत्या काही दिवसात लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे. पोलीना ग्लेन असे त्या तरुणीचे नाव असून ती रशियन नृत्यांगणा आहे. जॉनी हा 55 वर्षांचा आहे तर पोलीना अवघी 25 वर्षांची आहे.

johny-depp-polina-1

 गेल्या काही दिवसांपासून जॉनी आणि पोलीना सतत एकमेकांसोबत दिसत आहेत. तसेच नुकतेच ते एका हॉलिडे वरून परतले आहेत. येत्या काही दिवसात जॉनी पोलीनाच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी रशियाला जाणार असल्याचे समजते. पोलीनाच्या कुटुंबीयांनी या लग्नाला होकार दिला तर ते लगेचच लग्न करणार असल्याचे समजते.

जॉनीने याआधी 2015 मध्ये अंबर हड सोबत लग्न केले होते. मात्र हे लग्न फार काळ टिकले नाही. 2017 मध्ये त्यांच्यातील मतभेदांमुळे त्यांनी घटस्फोट घेतला. तसेच अंबरने जॉनीवर दारूच्या नशेत मारहाण केल्याचा आरोप देखील केला होता.