मोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स

Google प्ले स्टोर मध्ये हजार प्रकारचे अॅप असतात. आपल्या आवश्यकतेनुसार युझर ते डाउनलोड करतात आणि त्याचा वापरही करतात. प्ले स्टोरमध्ये काही असेही अॅप्स असतात जे तुमचं नुकसान करू शकतात. जर तुम्ही या अॅप्सवर वेळीच लक्ष दिलं नाही तर तुमच्या बँकेच्या खात्यातील पैसे काही क्षणात गायब होऊ शकतात. अशा प्रकारचे व्हायरस असलेल्या अॅप्सची माहिती समोर आली आहे.

Zscaler चे ThreatLabz च्या सायबर सिक्युरिटी रिसर्चर्सने 11 असे अॅप्सची माहिती जारी केली आहे. ज्यापासून युझरने सावध राहणे आवश्यक आहे. या अॅप्समध्ये जोकर फॅमिली मालवेअर आहेत, जे तुमच्या स्मार्टफोनचं नुकसान करू शकतात. जोकरला लोकांवर पाळत ठेवणे, त्यांची माहिती चोरणे आणि SMS मॉनेटर करण्यासाठी डिझाइन केलं गेलं आहे.

हा स्पायवेअर अशा प्रकारे डिझाइन केलं गेलं आहे की ते SMS मेसेज, काँटॅक्ट लिस्ट आणि डिवाइसची माहिती चोरी करू शकतो. तसेच हा स्पायवेअर तुमच्या न कळत प्रीमियम वायरलेस अॅप्लिकेशन प्रोटोकॉल (WAP) सर्व्हिसेस साइन अप करतात.

जेव्हा अॅप्समधून मालवेअर डिवाइसमध्ये दाखल होतो तेव्हा तो विचित्र पद्धतीने काम करतो. आर्थिक तोटाही मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. त्यामुळेच सावध राहणे आवश्यक आहे.

Zscaler च्या अभ्यासानुसार गेल्या काही महिन्यांमध्ये अँड्रॉइड अॅप्समध्ये 50 हून अधिक जोकर पेलोड्स डिटेक्ट करण्यात आले आहेत. या मालवेअर्सने खासकरून आरोग्य आणि फिटनेसशी जोडलेल्या अॅप्सना टार्गेट केलं आहे. त्यासोबतच फोटोग्राफी, टूल्स, पर्सनलायजेशन आणि कम्युनिकेशन कॅटेगरी देखील आहे.

रिसर्चर्सचे म्हणणं आहे की मालवेअर पब्लिशर्स Google Play च्या तपास प्रक्रिया आणि संरक्षण तंत्राला चकवा देण्यासाठी नवनवीन प्रयोग करत असतात. इथे ती लिस्ट देत आहोत ते आपल्या फोनमध्ये असल्यास डिलिट करा.

Translate Free,
PDF Converter Scanner,
Delux Keyboard,
Saying Message,
Free Affluent Message,
Comply QR Scanner,
PDF Photo Scanner,
Font Style Keyboard,
Private Message,
Read Scanner,
Print Scanner.

आपली प्रतिक्रिया द्या