मराठा आरक्षणावर आज निकाल

4
mumbai-high-court1

सामना ऑनलाईन, मुंबई

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या व संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणावर उद्या गुरुवार, 27 जून रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही यावर न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांचे खंडपीठ आपला अंतिम निर्णय देणार आहे. आरक्षणाला असलेला याचिककर्त्यांचा विरोध आणि आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारने केलेला युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आता तब्बल तीन महिन्यांनंतर हायकोर्ट यावर आपला निकाल देणार आहे.