100 कोटी खंडणी वसुली प्रकरणातील आरोपी, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला मंगळवारी उच्च न्यायालयाने झटका दिला. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी काही वैयक्तिक कारणांमुळे वाझेच्या याचिकेवर अंतरिम आदेश देण्यास नकार दिला.
वाझे मार्च 2021 पासून तुरुंगात आहे. सुटकेसाठी त्याने हेबिअस कॉर्पस याचिका केली होती. त्याच्या याचिकेवर न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकले व अंतरिम आदेश राखून ठेवला होता.
मंगळवारी तो आदेश दिला जाण्याची शक्यता होती. मात्र सुनावणी सुरू होताच न्यायमूर्ती डांगरे यांनी, वैयक्तिक कारणांमुळे आदेश देऊ शकत नाही. हे प्रकरण अन्य खंडपीठापुढे सुनावणीसाठी सादर करा, असे नमूद केले. तुरुंगातून सुटकेसाठी धडपड करणाऱ्या वाझेला हा मोठा झटका मानला जात आहे.