महिलेला जाळण्याचा प्रयत्न करणार्‍या प्रियकराला न्यायालयीन कोठडी

671

लासलगाव येथे महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणार्‍या रामेश्वर भागवला आज न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

लासलगाव येथील बसस्थानकावर 15 फेब्रुवारी रोजी रामेश्वर भागवत याने एका महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तो पोलीस कोठडीत होता. आज त्याला निफाड न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, सदर जखमी महिलेवर मुंबईत उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर आहे. तसेच बाटलीत पेट्रोल दिल्याप्रकरणी पेट्रोलपंप कर्मचारी आकाश सागर शिंदे (19) याला आज पोलिसांनी अटक केली, न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या