जुलै ठरला जगातील विक्रमी ‘हॉट’ महिना

393

गेला जुलै महिना हा जगातला विक्रमी ‘हॉट’ महिना ठरला. या महिन्यात जगभरात सर्वाधिक तापमान नोंदले गेले, अशी माहिती अमेरिकेच्या नॅशनल ओशिएनिक ऍण्ड ऍटमॉस्फेरीक ऍडमिनिस्ट्रेशनने (एनओएए) दिली आहे. यापूर्वी जुलै 2016 या महिन्यात सर्वाधिक तापमान नोंदले गेले होते. जुलै महिन्यात पृथ्वीवरील बहुतांश देशांमधील नागरिकांना घामाघूम केले होते. कारण त्या महिन्यात तापमानाने सर्व विक्रम मोडीत काढले होते. अगदी आर्टिक्ट आणि अंटार्क्टिक महासागरातील बर्फही वितळून गेला होता. जुलै महिन्यातील जागतिक तापमान सरासरी 1.71 फॅरेनहाइट नोंदले गेले. गेल्या 140 वर्षांतील तापमानाचा विक्रम त्याने मोडला, असे ‘एनओएए’च्या शास्त्रज्ञांनी सांगितले. आतापर्यंतचे सर्वाधिक तापमानाच्या दहा जुलै महिन्यांपैकी नऊ हे 2005 पासूनचे होते.

आपली प्रतिक्रिया द्या