ज्युनियर हॉकी वर्ल्ड कपचा धमाका भुवनेश्वरमध्ये, 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरमध्ये रंगणार स्पर्धा

सीनियर पुरुषांचा हॉकी वर्ल्ड कप 2018 सालामध्ये आयोजित केल्यानंतर आता ओडिशामधील भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियम ज्युनियर हॉकी वर्ल्ड कपसाठी सज्ज झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेची स्पर्धा या वर्षी 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत रंगणार असून 16 देशांमध्ये जेतेपदाची झुंज लागणार आहे. ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप भुवनेश्वर येथे होणार असल्याची घोषणा गुरुवारी करण्यात आली. याप्रसंगी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, ओडिशाचे क्रीडामंत्री तुषारकांती बेहेरा, आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. नरींदर बत्रा व हॉकी इंडियाचे जनरल सेव्रेटरी राजिंदर सिंग या मान्यवरांची उपस्थिती होती.

2023मध्येही वर्ल्ड कपच्याही आयोजनाचा मान

हिंदुस्थानात हॉकीचा आणखी एक वर्ल्ड कप आयोजित करण्यात येणार आहे. 2023 सालामध्ये सीनियर पुरुषांच्या हॉकी वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. ही महत्त्वाची स्पर्धा भुवनेश्वर व रौरकेला येथे खेळविण्यात येणार आहे.

कोरोनाच्या काळातही स्पर्धा यशस्वी करून दाखवणार

ज्युनियर हॉकी वर्ल्ड कपचे आयोजन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नवीन पटनायक म्हणाले, ओडिशा हॉकी या खेळाचे देशातील ‘हब’ म्हणून ओळखले जात आहे. यापुढेही आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव उज्ज्वल होईल यासाठीच प्रयत्न करण्यात येणार आहेत. ज्युनियर हॉकी वर्ल्ड कपसारख्या मानाच्या स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळाल्याचा आनंद आहे. आता 16 देशांचे यजमानपद भूषवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत.

ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणारे संघ

 • हिंदुस्थान
 • कोरिया
 • मलेशिया
 • दक्षिण आफ्रिका
 • इजिप्त
 • बेल्जियम
 • इंग्लंड
 • फ्रान्स
 • जर्मनी
 • नेदरलॅण्ड
 • स्पेन
 • अमेरिका
 • कॅनडा
 • चिली
 • अर्जेंटिना
 • पाकिस्तान
आपली प्रतिक्रिया द्या