टीम इंडियाच्या खेळाडूचे अभिनेत्रीशी गुटरगू, फोटो शेअर केल्याने चर्चांना उधाण

5856

क्रिकेटच्या मैदानावर धमाकेदार खेळ करणारे खेळाडूंचे बॉलिवूडशीही तेवढेच जवळीकतेचे नाते आहे. बॉलिवूड कलाकार आणि क्रिकेट खेळाडू यांचे सूत जुळल्याचे आपण याआधी अनेकदा पाहिले आहे. टीम इंडियाचा माजी खेळाडू झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाडगे असो अथवा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा असो. या जोड्या बॉलिवूड आणि क्रिकेटचे नाते किती घट्ट आहे याचा पुरावाच आहे. आता आणखी एक जोडी सध्या चर्चेत आली आहे.

टीम इंडियाचा विस्फोटक सलामीवीर खेळाडू के.एल. राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या गुटरगू सुरू असल्याची चर्चा आहे. हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू असताना राहुलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अथियासोबतचा एक फोटो शेअऱ केला आहे. यामुळे नव्याने चर्चेला उधाण आले आहे. तसेच यामुळे अथियासोबतच्या नात्याला अप्रत्यक्षपणे कबुली दिल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी अथिया हिचा काल (5 नोव्हेंबर) वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसानिमित्त राहुलने तिच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला व त्यावर ‘हॅपी बर्थडे’ असे लिहिले. या दोघांचा कॅफेमधला हा फोटो असून यात राहुल अथियाकडे बघतोय आणि ती हसतेय असे दिसतेय.

rahul-1

आपली प्रतिक्रिया द्या