काबूलमधील भीषण बॉम्बस्फोटात 18 ठार

फोटो प्रातिनिधिक

काबूलमधील एका शैक्षणिक केंद्राबाहेर शनिवारी झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात 18 जण ठार, तर शाळकरी विद्यार्थ्यांसह 57 जण जखमी झाले. काबूलच्या पश्चिम भागातील ‘दश्त-ए-बर्ची’ या शियाबहुल परिसरातील शैक्षणिक केंद्राबाहेर हा स्फोट झाला.

हल्लेखोर या केंद्रात शिरण्याचा प्रयत्न करत असताना सुरक्षा कर्मचाऱयांनी त्याला थांबवले असता त्याने स्फोट घडवून आणला, असे अंतर्गत मंत्रालयाचे प्रवक्ता तारिक अरियन यांनी सांगितले. अद्याप कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नसून, तालिबानने या हल्ल्याशी आपला संबंध नसल्याचे म्हटले आहे.

ऑगस्ट 2018 मध्ये एका शैक्षणिक केंद्रात झालेल्या अशाचप्रकारच्या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी आयसिसशी संलग्न एका संघटनेने स्वीकारली होती. या हल्ल्यात 34 विद्यार्थी ठार झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या