कैलास वाघमारे दमदार भूमिकेत

स्वप्न पाहणे आणि ती पूर्ण करण्यासाठी धडपडणे, त्यादरम्यान माणसाच्या वेगवेगळय़ा वृत्ती अनुभवास येणे असा प्रवास असलेला ‘घोडा’ हा चित्रपट येत्या 17 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विविध महोत्सवांमध्ये गौरव झालेल्या या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच लॉन्च करण्यात आले. बांधकाम मजुराचा मुलगा शेजारी राहणाऱया मुलासाठी आणलेला घोडा पाहून तसा घोडा आणण्याची मागणी करतो, पण आर्थिक परिस्थिती बिकट असलेले त्याचे वडील काय धडपड करतात त्याची गोष्ट ‘घोडा’ या चित्रपटात मांडण्यात आली आहे. अभिनेता कैलास वाघमारे, अर्चना खारतुडे, दिलीप धनावडे, राहुल बेलापूर, शिवराज नाळे, देवेंद्र देव, प्रफुल्ल कांबळे, वज्र पवार यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन टी. महेश यांनी केले आहे, तर संवाद लेखन निलेश महिगावकर यांचे आहे.