भरपावसात काळबादेवीतील पाटीलवाडी,कदमवाडीत पाच दिवस पाणीटंचाई

रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या पाटीलवाडी आणि कदमवाडीत गेले पाणीपुरवठा झालेला नाही.या दोन्ही वाडीतील ग्रामस्था संतापले आहेत.

जलस्वराज्य योजनेतून या गावात नळपाणी योजना सुरू करण्यात आली आहे.मात्र पाटीलवाडी आणि कदमवाडीतील ग्रामस्थांना अनेकवेळा पाण्यापासून वंचित राहावे लागते.भरपावसात गेले पाच दिवस पाटीलवाडी आणि कदमवाडीत पाणी पुरवठा झालेला नाही.श्रावण महिन्यातच पाण्याची बोंब झाल्याने ग्रामस्थ संतापले आहेत.काळबादेवी ग्रामपंचायतीच गावातील पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.