कल्की भगवानकडे 500 कोटींची अघोषित संपत्ती

271

स्कयंघोषित आध्यात्मिक धर्मगुरू कल्की भगवान आणि त्यांचा मुलगा कृष्णा यांच्या अनेक आश्रमांवर आयकर विभागाने मारलेल्या धाडींत प्रचंड प्रमाणात संपत्ती जप्त करण्यात आली आहे. कल्की भगवानच्या आश्रमांतून पाच कोटींच्या हिऱयांसह 43.9 कोटींची संपत्ती आयकर विभागाने जप्त केली असून,  कल्की भगवानकडे एकूण 500 कोटींची अघोषित संपत्ती असल्याचे उघडकीस आले आहे. आयकर विभागाने आज कल्की भगवानच्या आश्रमावर घातलेल्या धाडींत 18 कोटी रुपयांचे अमेरिकन डॉलर्स, 26 कोटी रुपये किमतीचे 88 किलो सोने, 1271 कॅरेटचा पाच कोटींचा हिरा आदी संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या