
प्रभासच्या ‘कल्कि 2898 एडी’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवरची जादू कायम आहे. 27 जून रोजी प्रदर्शित झालेल्या ‘कल्कि’ने कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. जगभरात एक हजार कोटीच्या क्लबमध्ये चित्रपटाने प्रवेश केला आहे. केवळ देशातच नव्हे तर देशाबाहेरही हा चित्रपट दमदार कमाई करत आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये ‘कल्कि’ सर्वाधिक कमाई करणार्या टॉप 10 इंडियन सिनेमाच्या यादीत पोचलाय. त्याने शाहरुखच्या ‘पठाण’लाही मागे टाकलंय. नॉर्थ अमेरिकेच्या बाबतीत सांगायचे तर ‘कल्कि’ ने 16 व्या दिवशी 17.15 मिलियन डॉलर्स कमवले, तर शनिवारी 3. 1 लाख अमेरिकन डॉलर्स कमाई झाली.