गरोदर आहे म्हणून लग्न करणार नाही, अभिनेत्री कल्किचा खुलासा

2471

बॉलिवूड चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये झळकलेली अभिनेत्री कल्कि कोचलीन हिच्या प्रेग्नेंसीची इंडस्ट्रीमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. कल्किने काही दिवसांपूर्वी बेबी बंपचा फोटो शेअर करत लग्नाअगोदर गरोदर असल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी तिने ‘अनपेक्षित गर्भधारणा’ (Unexpected Pregnancy) असाही उल्लेख केला होता. आता तिने आणखी एक खुलासा केला आहे.

‘मिड डे’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कल्कि म्हणते की, ‘सुरुवातीला गरोदरपणाबाबत मला काहीही वाटलं नाही. माझ्यात असे काही खास बदल जाणवले नाहीत. मला हे माझ्या शरिरावर एका परकीय आक्रमणासारखे जाणवले. माझ्या शरिरातील एक-एक गोष्ट शोषली जात असल्याचे जाणवत होते. परंतु जेव्हा मी बाळाच्या ह्रदयाचे ठोके पहिल्यांदा ऐकले तेव्हा हे मला खुपच खास वाटलं. मला खुप उत्साही वाटू लागले. गर्भधारणेचे पहिले तीन महिने खूपच खराब होती, परंतु आता मी पुढे आशेने बघत असून जानेवारीतील तारखेची वाट पाहात आहे.’

कल्किच्या प्रेग्नेंसीवर ‘Ex Husband’ अनुराग कश्यपची पहिली प्रतिक्रिया

कल्कि पुढे म्हणाली की, ‘मी गरोदर आहे म्हणून लग्नाची घाई करणार नाही. जर कोणत्या कागदपत्रासाठी किंवा बाळाच्या शाळेच्यावेळी गरज वाटली तर आम्ही विचार करू. पण आम्ही आमच्या प्रेमाशी वचनबद्ध आहोत आणि आम्ही कुटुंबाशी प्रामाणिक आहोत.’

दरम्यान, कल्कि ही सात महिन्यांची प्रेग्नंट असून लवकरच बाळाला जन्म देणार आहे. आपल्या बाळाचा जन्म वॉटर बर्थ पद्धतीने व्हावा आणि त्याला एखादं युनिसेक्स (स्त्री आणि पुरुष दोहोंसाठीचे) नाव द्यावं अशी इच्छा तिने मुलाखतीत बोलून दाखवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या