सेक्रेड गेम्समधली ‘ही’ अभिनेत्री लग्नाआधीच गरोदर

2237

अभिनेत्रीने लग्नापूर्वी गरोदर राहणं ही नवीन बाब राहिलेली नाही. नीना गुप्तापासून ते अॅमी जॅक्सन अशी बरीच नावं या यादीत आहेत. या यादीत अजून एका नावाची भर पडली आहे. बॉलिवूडमधील चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये झळकलेली एक अभिनेत्री लग्नाआधीच गरोदर असल्याचं वृत्त आहे.

काही दिवसांपूर्वीच ही अभिनेत्री सेक्रेड गेम्स या वेबसीरिजमध्ये झळकली होती. या अभिनेत्रीचं नाव आहे कल्की कोएचलिन. 2015 दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर ती बराच काळ सिंगल होती. त्यानंतर ती गाय हर्शबर्ग याच्या प्रेमात पडली. त्यांच्या प्रेमसंबंधांत आता कल्की पाच महिन्यांची गरोदर असून ती प्रसुतीसाठी वॉटर बर्थ या थेरपीची निवड करणार असल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलं आहे. गाय हर्शबर्ग हा इस्त्रायली शिक्षक, गीतकार आणि संगीतकार आहे.


View this post on Instagram

It’s always a Sunday when I’m with my favourite caveman

A post shared by Kalki (@kalkikanmani) on

आपल्या बाळाचा जन्म वॉटर बर्थ पद्धतीने व्हावा आणि त्याला एखादं युनिसेक्स (स्त्री आणि पुरुष दोहोंसाठीचे) नाव द्यावं अशी इच्छा तिने मुलाखतीत बोलून दाखवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या