कल्याणच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांचे निधन

1444

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने ज्युपिटर रुग्णालयात निधन झाले. त्या 46 वर्षांच्या होत्या. महापौर म्हणून त्यांनी कल्याण-डोंबिवली शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यांच्या मागे पती, विवाहित मुलगी, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. कल्याणी पाटील यांना न्युमोनियाच्या त्रासामुळे ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या