
कल्याणातील नामांकित दुकानातून खरेदी केलेला 30 हजार रुपये किमतीचा लग्नाचा लेहंगा घरच्यांना पसंत न पडल्याने तो परत करून पैसे देण्याची मागणी तरुणीने केली. मात्र पैसे परत देण्यास नकार दिल्याच्या रागातून तरुणीच्या संतापलेल्या मित्राने दुकानातच गोंधळ घालत चाकूने लेहंगा टराटरा फाडला. इतकेच नव्हे तर कामगारांना मारण्याची धमकीही दिली. या घटनेनंतर मॅनेजर प्रवीण समाता यांनी बाजापेठ पोलीस ठाण्यात धाव घेताच पोलिसांनी सुमित सयानी याला अटक केली.
कल्याणच्या लालचौकी परिसरात
असलेल्या कपड्याच्या कलाक्षेत्र दुकानातून एका तरुणीने लग्नासाठी 32 हजार 300 रुपयांचा लेहंगा खरेदी केला होता. मात्र हा लेहंगा घरच्यांना पसंत न पडल्याने दुपारी ती लेहंगा परत करण्यासाठी दुकानात आली. मात्र आपल्याला पैसे परत केले जात नसून त्या किमतीची दुसरी वस्तू खरेदी करण्याचा सल्ला दुकानदाराने दिला. मात्र दुकानात दुसरी पसंतीची वस्तू न मिळाल्याने ऑगस्ट महिन्यात नवा स्टॉक आल्यानंतर खरेदी करण्याचे मान्य करत ती निघून गेली.
ठार मारण्याची धमकी
पैसे परत न केल्याने संतापलेल्या सुमित याने संध्याकाळी दुकानात येत गोंधळ घाल त पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र में नेजरने पैसे परत देता येत नसल्याचे सांगताच संतापलेल्या सुमित याने खिशातून चाकू काढून तरुणीने परत केलेला लेहंगा फाडून कामगारांना मारण्याची धमकी दिली. यानंतर घाबरलेल्या दुकानच्या मॅनेजरने बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.