आईच्या मृतदेहाजवळ ‘तो’ चार दिवस बसून होता..

कोणत्या तरी आजाराने एका महिलेचे निधन झाले. 14 वर्षीय मुलाला वाटले की, आपली आई झोपली आहे. तो मनोरुग्ण असल्याने त्याला फारसे काहीच समजेना. घरात तो एकटाच होता. आजूबाजूच्या घरातील कोणालाच महिलेच्या निधनाची गंधवार्ताही नव्हती. पण दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा ठोठावला. तेवढ्यात मुलाने दरवाजा उघडला तेव्हा ‘ती’ महिला निपचित पडल्याचे दिसून आले. सिलिविया डॅनिअल असे या 44 वर्षीय दुर्दैवी महिलेचे नाव असून कल्याणच्या खडकपाडा परिसरात काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. दरम्यान पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करीत आहेत.

कल्याणमधील धक्कादायक घटना

संकुलातीमध्ये महिलेचा तिच्या फ्लॅटमध्ये चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला. मात्र त्यावेळी कोणालाच याची माहिती नव्हती. तिच्यासोबत राहणारा मुलगा एल्विन हा मानसिक आजाराने त्रस्त आहे. त्यामुळे आपली आई सिलिविया हिचा मृत्यू झाल्याचा थांगपत्ता लागला नाही. त्याला वाटले माझी आई आजारी आहे त्यामुळे ती झोपली असावी. पण प्रत्यक्षात तिचा मृत्यू झाला होता. मात्र ती झोपली नसून तिचा मृत्यू झाला हे त्याला कळलेच नाही.

एल्विन डॅनिअल या मुलाने आजारी आई सिलिविया डॅनियल हिच्या मृतदेहासोबत चार दिवस काढल्याचे पोलिसांनी सांगितले. कल्याण पश्चिम परिसरातील खडकपाडा या भागात एका निवासी

अखेर चार दिवसांनंतर शेजाऱ्यांना डॅनियल यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे समजले. बुधवारी सुरक्षारक्षक व शेजारचे दुर्गंधीबाबत विचारणा करण्यासाठी डॅनियल यांच्या फ्लॅटवर गेले असता मुलाने दरवाजा उघडला. हे करुण दृश्य बघून शेजारच्यांना धक्का बसला आणि त्यांनी तत्काळ खडकपाडा पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी आले तेव्हा त्यांना फ्लॅटमध्ये एल्विनच्या आईचा दुर्गंधी येत असलेला मृतदेह आढळला