कांदा मिळाला नाही म्हणून लसूण चोरला

516

कांद्याचे भाव वाढत असल्याने चोरटय़ांनी आता आपला फोकस शेतमाल चोरीकडे वळवला आहे. कल्याण बाजार समितीतील कांद्याची गोडाऊन्स चोरटय़ांनी टार्गेट केली आहेत. मंगळवारी रात्री चोरटय़ांनी एक गोडाऊन फोडले. मात्र आत कांदाच नसल्याने चोरटय़ांनी 10 गोणी लसूण आणि पाच गोणी नारळ लंपास केले. 63 हजारांचा शेतमाल लंपास केल्याने क्यापाऱयांमध्ये खळबळ उडाली आहे.

शेतमालाचे भाव वाढत असल्याने एकीकडे गृहिणींचे बजेट कोलमडले असताना आता क्यापाऱयांनाही मालाची गोडाऊन सुरक्षित ठेवण्याची चिंता भेडसावत आहे. कल्याण बाजार समितीत देवीचंद भनगडे यांचे हरिओम एण्टरप्राइजेस नावाने कांदा, बटाटा, लसूण विक्रीचा घाऊक व्यवसाय आहे.

मंगळवारी मध्यरात्री त्यांच्या मालाचे गोडाऊन चोरटय़ांनी फोडले. यावेळी दरवाढीमुळे देवीचंद यांनी कांदा भरलाच नव्हता. त्यामुळे चोरटय़ांनी 55 हजारांची 10 गोणी लसूण, साडेआठ हजारांचे 5 गोणी नारळ चोरून नेले. बाजार समितीत 24 तास सुरक्षारक्षक असतानाही टेम्पोमधून शेतमाल चोरून नेताना कुणालाच कसे वळले नाही याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. कर्मचाऱयांचा यामध्ये सहभाग आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या