
दिग्दर्शक नाग अश्विन यांचा ‘कल्की 2898 एडी’ हा सिनेमा मागील काही वर्षांतील सर्वात भव्य आणि महागड्या सिनेमांपैकी एक ठरला आहे. या साय-फाय थ्रिलरने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केले असून यात प्रभास, अमिताभ बच्चन आणि कमल हासन यांसारख्या दिग्गज सुपरस्टार्सनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमातील कमल हासन यांनी घेतलेल्या मानधनाची चर्चा आता रंगली आहे. कमल हासन यांनी ‘कल्की 2898 एडी’मधील भूमिकेसाठी 150 कोटी रुपये मानधन घेतले होते. निर्माता युगी सेतू यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली. विशेष म्हणजे कमल हासन यांनी या चित्रपटासाठी अवघ्या 20 दिवसांचे शूटिंग केले होते. म्हणजे प्रति दिन 7 ते 8 कोटी रुपये त्यांनी मानधन घेतले.




























































