
सर्वसामान्य पालक आपल्या पाल्यांच्या यशाचा आनंद जोरदार साजरा करतात. मात्र कर्नाटकात एका जोडप्याने चक्क मुलगा नापास झाल्याचे सेलिब्रेशन केले आहे. मुलगा दहावीच्या परीक्षेत सर्व विषयात नापास झाला. मात्र मुलाच्या अपयशाबाबत मुलाला रागावण्याऐवजी पालकांनी जंगी पार्टी केली. मुलगा नापास झाल्यानंतर केक कापून सेलिब्रेशन केले.
कर्नाटकातील बागलकोट येथील एका खाजगी शाळेतील अभिषेक याने राज्य बोर्ड परीक्षेत 625 पैकी फक्त 200 गुण मिळवले. तो कोणत्याही विषयात उत्तीर्ण होऊ शकला नाही. परंतु याबाबत त्याच्यावर रागवण्याऐवजी त्याच्या पालकांनी त्याचे मनोबल उंचावण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पुढच्या प्रयत्नात चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी केक आणि मिठाई मागवली.
परीक्षेत नापास झाला असला तरी अभिषेकने परीक्षेला गांभीर्याने घेत प्रामाणिकपणे अभ्यास केला होता. या सेलिब्रेशनमुळे अपयशामुळे आलेली निराशा दूर करण्यास मदत झाली, असे कुटुंबाने सांगितले. दरम्यान, पुढच्या प्रयत्नात मी सर्व विषय उत्तीर्ण करेन, असा दृढनिश्चय अभिषेकने बोलून दाखवला.