बॉलीवूड अभिनेत्री आणि लोकसभा खासदार कंगना रनौतचा इमरजेंसी हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत अडकला असल्याची माहिती खुद्द कंगनाने दिली आहे. सिनेमात कंगनाने दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. सेन्सर बोर्डाच्या सदस्यांना धमक्या मिळत असल्याचा दावाही कंगनाने केला आहे. इमरजेंसी सिनेमाला सेन्सर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. धमक्यांमुळे सेन्सर प्रमाणपत्र रोखण्यात आल्याचा दावा कंगनाने केला आहे.