
अभिनेत्री आणि भाजपची खासदार कंगना रणौत हिला शेतकऱ्यांबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. तिच्याविरुद्ध आग्रा येथील न्यायालयात अपमान व देशद्रोहाचा खटला चालणार आहे. 2020 मध्ये शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत होते. त्यावेळी शेतकऱ्यांची तुलना त्यांनी खलिस्थानी दहशतवाद्यांशी केली होती. त्यामुळे तिच्याविरोधात रामाशंकर शर्मा या वकिलाने 2024 मध्ये याचिका दाखल केली होती.
























































