कोकणात भात शेती जरी मुख्य व्यवसाय असला तरी देखील कणघर सारख्या पीकाचं उत्पादन इथे मोठ्या प्रमाणात होते. कणघर म्हणजे एकप्रकारचे कंदमूळ असून त्याला नवरात्र्याच्या दिवसांध्ये मोठी मागणी असते. कणघरच्या शेतीवर वातावरणातील बदलांचा कोणताही परिणाम होत नाही. 5 ते 6 महिन्यांची ही कणघरची शेती किफायतशीर असल्याने कोकणातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर ही शेती करतात. एप्रिल, मे, जून अशा 3 महिन्याच्या कालावधीत शेतकरी कणघरची लागवड करतात.
लवकर लागवड करून बाजारपेठेत जेवढे लवकर कणघर येईल तेवढा शेतकऱ्यांना नफा मिळतो. एकाच वेळी उत्पन्न बाजारपेठेत आले तर दर कमी मिळतो. परिणामी शेतकऱ्यांना नुकसानाला तोंड द्यावे लागते. त्यामुळे शेतकरी एप्रिल, मे, जून अशा पद्धतीने कणघरची लागवड करतात.
जमिनीखाली वाढणाऱ्या वनस्पतींना कंदमूळं असं म्हणतात. उपवासाच्या दिवशी किंवा सॅलेडमधून कंदमूळं खाण्याची पद्ध आहे. जमिनीखाली दडलेल्या या कंदमुळांमध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्व असतात. ज्यामुळे त्वरीत ऊर्जा मिळू शकते. कणघर बाहेरून लाल आणि आतून पाढऱ्या रंगाची असतात. पचनास हलके असल्यामुळे तुम्ही कणघर कधीही खाऊ शकता. सामान्यपणे उपवासाच्या दिवशी कणघर उकडून खाल्ले जाते. कणघरमध्ये फासबर्स, व्हिटॅमिन ए, बी 6, सी, डी आणि ई, पोटॅशियम, लोह असतात. जे आरोग्यासाठी चांगले आहेत.
कंदांतील सर्वात पौष्टिक कणघरचा कंद. कोकणात हा पावसाळ्यात अनेक ठिकाणी शेतकरी उत्पादन घेण्यासाठी म्हणून लावतात. कणघरला पांढरी रताळी असेही म्हणतात. हे कंद मातीत झुबक्याने लागतात. ते आकाराने लांबट गोल असून त्यावर थोडेसे उंचवटे असतात. एका कणघरचे वजन अंदाजे 100 ते 150 ग्रॅम असते. हे उकडून किंवा चुलीतील राखेत भाजून खातात.
अमोल किर्तीकर यांनी देखील कणखरची शेती करत इथल्या शेतकऱ्यांना आणि कणखर व्यावसायिकांना प्रोत्साहन दिलं आहे.