कंगनाचे अकाऊंट बंद

ट्विटरने अभिनेत्री कंगना राणावत हिचे अकाऊंट कायमचे बंद केले आहे. भडकाऊ ट्विट्स केल्याबद्दल ट्विटरने ही कारवाई केली आहे. ट्विटरवरील ‘अॅट कंगना टीम’ या अकाऊंटवर आता ‘अकाऊंट सस्पेंडेड’ असा मेसेज येत आहे.

पश्चिम बंगालमधील निवडणुकीसंदर्भात कंगनाने आक्षेपार्ह ट्विट्स केली होती. ममता बॅनर्जींचे धोरण, तृणमूल काँग्रेसचा विजय आणि निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराबद्दल तिने लिहिले होते. या हिंसाचाराला ममता बॅनर्जी जबाबदार असून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, असे तिने लिहिले होते.

दरम्यान, कंगनाने यावर प्रतिक्रिया देताना ‘तपकिरी लोकांना गुलाम बनवण्याची अमेरिकन लोकांची मानसिकता असते असे माझे म्हणणे ट्विटरने पुन्हा एकदा सिद्ध केले.’ असे म्हटले आहे.

कुणाचाही अपमान करण्यासाठी, धमकावण्यासाठी आणि आवाज दाबण्यासाठी आमच्या व्यासपीठाचा वापर करणे हे आमच्या धोरणाविरुद्ध आहे, असे ट्विटरने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या