हिंदुत्वाचा पाया खोटेपणा म्हणणाऱ्या अभिनेत्याला अटक

हिंदुत्वाचा आधार हा खोटेपणा आहे, असं आक्षेपार्ह विधान ट्वीट करणाऱ्या एका प्रसिद्ध अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. या अभिनेत्याचं नाव चेतन कुमार असं आहे.

सोमवारी चेतनने हिंदुत्वाविषयी काही ट्वीट केली होती. त्यात हिंदुत्व हे खोटेपणावर आधारित असल्याचं आक्षेपार्ह विधानही केलं होतं. त्या ट्वीटनंतर एकच गहजब झालो होता. हिंदुत्ववादी संघटनेने चेतनवर आरोप करत कर्नाटकातील शेषाद्रीपुरम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

चेतन याने यापूर्वी सुद्धा प्रसिद्ध कन्नड चित्रपट कांतारा यातील एका प्रथेविरुद्ध आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यावेळी देखील त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल झाली होती.