तमिळ भाषेतूनच कानडीचा जन्म, अभिनेते कमल हासन यांच्या विधानाने वाद

कानडी भाषेचा जन्म हा तमिळ भाषेतून झाला आहे असे विधान अभिनेते कमल हासन यांनी केले होते. त्यामुळे एकच वाद निर्माण झाला होता. हासन यांनी माफी मागावी अशी मागणी होत आहे.

कमल हासन यांचा थग लाईफ हा नवीन सिनेमा येऊ घातला आहे. या सिनमेच्या म्युझिक लॉन्च वेळी हास म्हणाले होते की कन्नड भाषेचा जन्म हा तमिळ भाषेतून झाला आहे. या कार्यक्रमाची सुरूवात हासन यांनी माझे आयुष्य माझे कुटुंब तमिळ भाषा असल्याचे म्हटले. त्यानंतर कन्नड अभिनेता शिवराजकुमार यांच्याकडे बोट दाखवत शिवराजकुमार माझ्याच कुटुंबातील भाग आहे असं म्हटल. त्यानंतर त्यांची कन्नड भाषा तमिळमधून जन्मली असेही म्हटले.

त्यानंतर कर्नाटकात हासन यांच्याविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. कर्नाटकचे भाजप नेते बी.व्हाय विजयेंद्र यांनी हासन यांच्या विधानाला विरोध केला. विजयेंद्र म्हणाले की, कलाकारांनी प्रत्येक संस्कृतीचा आदर करावा. कमल हासन यांनी कानडी भाषेचा अपमान केला असून त्यांनी माफी मागाली अशी मागणी विजयेंद्र यांनी केली आहे.