प्रसिद्ध गायिकेने घेतला गळफास, आत्महत्येपूर्वी आईला पाठवला व्हॉईस मेसेज

2362

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायिकेने सोमवारी सकाळी गळफास घेत आत्महत्या केली. सुष्मिता असे आत्महत्या केलेल्या 26 वर्षीय गायिकेचे नाव आहे. पतीकडून होणारा त्रास आणि कौटुबिक कलहामुळे तिने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. आत्महत्येपूर्वी गायिकेने आईला एक व्हॉईस मेसेजही पाठवल्याचे उघड झाले आहे.

इंडिया टुडे‘ने दिलेल्या वृत्तानुसार, आत्महत्येपूर्वी सुष्मिताने आईला एक व्हॉईस मेसेज पाठवला. या मेसेजमध्ये त्याला (पती शरथ) सोडू नका. मला माफ करा. मला त्रास देऊन नको अशी मी त्याला खूप विनवणी केली, परंतु त्याने ते सुरुच ठेवले. मी नेहमीच त्याला विरोध केला, परंतु त्याने त्याकडे लक्ष दिले नाही. मी माझ्याच कर्माची शिक्षा भोगत आहे, असे सुष्मिताने आईला पाठवलेल्या व्हॉईस मेसेजमध्ये म्हटले आहे.

तसेच ती पुढे म्हणते, मी याबाबत कधीच कोणाला सांगितले नाही. माझ्या पतीने मला बाहेर एकही शब्द बोलण्याची परवानगी दिली नाही. तो नेहमीच माझ्यावर आरडाओरडा करायचा, आणि मला घर सोडून जाण्यास सांगायचा. मला त्याच्या घरात मरायचे नाही. मी माझे आयुष्य मला हवे तिथे संपवू इच्छिते. तसेच कुटुंबाबाबत चिंता व्यक्त करताना ती म्हणते, आई, माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे. मला माहिती आहे माझा छोटा भाऊ सचिन तुझी काळजी घेईल. आपल्या मूळ गावी माझा अंत्यसंस्कार कर.

suicide-singer

दरम्यान, सुष्मिता हिचे लग्न एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करणाऱ्या शरथ कुमार (Sharath Kumar ) याच्याशी झाले होते. पतीकडून त्रास होत असल्यामुळे तिने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी अन्नपूर्णेश्वरी नगर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुष्मिताच्या आत्महत्येनंतर पती शरथ फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या