Photo – अबब..! मंदिर सजवण्यासाठी वापरल्या तब्बल 5 कोटींच्या नोटा

सध्या सणासुदीचा काळ असून भक्तांची मंदिरामध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. भक्तांच्या स्वागतासाठी मंदिरेही सजली आहेत. यात सर्वांचे लक्ष वेधून घेतेय ते आंध्र प्रदेशमधील नल्लोर येथील ऐतिहासिक वासवी कन्यका परमेश्वरी देवी मंदिर.

notes-ap

मंदिरामध्ये फुलांचे, फळांचे डेकोरेशन तुम्ही पाहिले असेल, मात्र नल्लोर येथील वासवी कन्यका परमेश्वरी देवी मंदिरामध्ये चलनी नोटांचे डेकोरेशन करण्यात आले आहे.

notes-temple

वासवी कन्यका परमेश्वरी मंदिरामध्ये तब्बल 5.16 कोटी रुपयांच्या चलनी नोटा वापरून सजावट करण्यात आली आहे. एक ऑक्टोबर रोजी ही सजावट करण्यात आली होती आणि याचे फोटो व्हायरल होत आहेत.

notes

दरम्यान, हे मंदिर नोटांनी सजवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. प्रत्येक वर्षी दसऱ्याच्या आधी हे मंदिर नोटांनी सजवले जाते.

आपली प्रतिक्रिया द्या