पैशाचे आमिष आम्हाला दाखवू नको, कपिल देव यांनी पाकिस्तानच्या शोएब अख्तरला झापले

7084

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानने पाकिस्तानला कोरोनाशी लढा देण्यासाठी सहकार्य करावे आणि पैशांच्या उभारणीसाठी हिंदुस्थान-पाकिस्तान सामने आयोजित करावे असे विधान केले होते. यावर हिंदुस्थानचे माजी कर्णधार आणि देशाला पहिला वर्ल्डकप जिंकून देणारे कपिल देव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कपिल देव यांनी पैशाचे आमिष आम्हाला दाखवू नको असे म्हणत शोएब अख्तरला झापले आहे.

काेराेना व्हायरसबाधितांवरील उपचारासाठी आमच्याकडे पैसे आहेत. त्यामुळे आम्हाला आर्थिक नड नाही. यातूनच काेणत्याही प्रकारच्या आर्थिक मदतीसाठी हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यांचे आयाेजन करण्यात येऊ नये, अशा शब्दांत कपिल देव यांनी अख्तरला चांगलेच सुनावले.

कोरोना महामारीच्या विळख्यात सापडल्याने पाकिस्तान आणि हिंदुस्थानमधील नागरिकांना याची मोठ्या प्रमाणात बाधा झाली आहे. या सर्वांच्या उपचारासाठी माेठ्या प्रमाणात खर्चाची गरज आहे. त्यासाठी आता हिंदुस्थान  पाकिस्तान या दाेन्ही संघांचे तीन सामने जित करण्यात यावेत. यातून जमा झालेल्या पैशाची देणगी काेराेनाग्रस्तांना देण्यात यावी, असा सल्ला पाकिस्तानचा माजी वेगवान गाेलंदाज शाेएब अख्तरने दिला हाेता. मात्र, त्याला माजी कर्णधार कपिल देव यांनी चांगलीच चपराक लावली.

बीसीसीआयला तोटा
दरम्यान, 15 एप्रिलपासून आयपीएलचा 13 वा हंगाम सुरू होण्याची आशा माळवली आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही याबाबत संकेत दिले आहे. त्यानुसार आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला मोठा तोटा होईल. या लढतीच्या प्रसारणातून मिळणारी आणि जाहिरातीद्वारे मिळणाऱ्या मोठ्या रक्कमेपासून बीसीसीआयला मुकावे लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या