कराडमध्ये गँगवारचा भडका; अग्निशमन दलाच्या गाडीच्या फोडल्या काचा

488

कराडमध्ये पुन्हा गँगवारचा भडका उडाल्याने दोन गटात राडा झाला आहे. पिस्टलचा धाक दाखवून दमदाटी करण्यात आली असून, संतप्त युवकांनी दगडफेक करत दुचाकीची जाळपोळ केली आहे. युवकांच्या दगडफेकीत एकजण जखमी झाला असून या झटापटीत अग्निशमन दलाच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान अमीर शेख व त्याच्या एका साथीदारांसह पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

दरम्यान, दोन्ही बाजूकडून शहर पोलिसात परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी 21 जणांवर गुन्हा नोंदवत दोघांना ताब्यात घेतले आहे. बुधवार पेठ, प्रभात टॉकीज परिसरात शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे कराड शहरात रविवारी दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. काही युवकांनी दुचाकी पेटवली होती ती विझवण्यासाठी तात्काळ नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. मात्र काही युवकांनी अग्निशमन दलाच्या गाडीच्या काचा फोडल्या.

आपली प्रतिक्रिया द्या