कर्नाटकचा तिढा कायम, सोमवारी होणार विश्वासदर्शक ठराव

80

सामना ऑनलाईन । बंगळुरू

कर्नाटकमध्ये गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा तिढा शुक्रवारीही सुटला नाही. शुक्रवारी संध्याकाळी विधानसभा अध्यक्षांनी विधानसभेचे सत्र सोमवारपर्यंत स्थगित केल्याने आता सोमवारी विश्वासदर्शक ठराव होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना सरकार टिकविण्यासाठी प्रयत्न करायला आणखी दोन दिवसांची मुदत मिळाली आहे. मात्र भाजपने विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाचा निषेध केला असून काँग्रेस जेडीएस आघाडीकडे बहुमत नसल्याने ते वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप केला आहे.

शुक्रवारी विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर राज्यपाल वाजूभाई वाला यांनी जेडीएस काँग्रेसला दुपारी दीड पर्यंत बहुमत सिद्ध करण्याची वेळ दिली होती. मात्र त्यावर बरीच चर्चा झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी कामकाज 3 पर्यंत स्थगित केले होते. त्यानंतर राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी 6 पर्यंतची वेळ दिली होती. यावर आक्षेप घेच मुख्य़मंत्री कुमारस्वामी यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी सोमवारपर्यंतचा वेळ द्यावी अशी याचिका केली होती. त्यानंतर कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठरावाचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घेण्यास सांगितले. त्यानंतर अध्यक्षांनी विधानसभेचे कामकाज स्थगित करत सोमवारी विश्वास दर्शक ठराव मांडण्याचे आदेश दिले.

आपली प्रतिक्रिया द्या